Posts

Privacy policy

Privacy Policy for sahaj suchalela kahi At sahaj suchalela kahi, accessible from sahajsuchalelakahi.blogspot.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by sahaj suchalela kahi and how we use it. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us. This Privacy Policy applies only to our online activities and is valid for visitors to our website with regards to the information that they shared and/or collect in sahaj suchalela kahi. This policy is not applicable to any information collected offline or via channels other than this website.  Consent By using our website, you hereby consent to our Privacy Policy and agree to its terms. Information we collect The personal information that you are asked to provide, and the reasons why you are asked to provide it, will be made clear to you at the point we

आज पुन्हा एकदा दि. ९-१-२०१९

 "माझ्या मनातील भावभावनांचे गुंतलेले पदर आज पुन्हा उलगडत चालले आहेत,स्वतःला पुन्हा कुठेतरी हरवून बसलो आहे. आयुष्याच्या आंधारकोठडीत रमलेल्या माझ्या मनाला, पुन्हा लख्ख प्रकाशाची ओढ लागली आहे.संवेदना हरवून बसलेल्या  माझ्या मनाला, पुन्हा कुठेतरी स्वतःला गुंतवण्याचा मोह होतोय." 🌹लखन दगडे🌹

कातळ दि.४-१२-२०१८

       कधीकधी तू वैशाख होऊन,तुझ्या आठवणी मनाला चटके देतात. कधी तू पाऊस होऊन, तुझ्या आठवणी मन मोहरून जातात. तर कधी तू वादळ होऊन, तुझ्या आठवणी मला उध्वस्त करतात.        पण प्रत्येकवेळी मी मात्र ऊनपाऊसात, वादळवाऱ्यात कातळ बनुन स्थितप्रज्ञा सारखा उभा असतो.  -: लखन दगडे

आज माझ्या वाढदिवसानिमित्त दि.२६-११-२०१८

  आज तुमचे अपार प्रेम पाहून, थोडी कृतज्ञता व्यक्त करावी वाटते. पण काय बोलणार शब्दच नाहीत माझ्यापाशी, समजून घ्या तुम्ही माझ शब्दांच तोकडेपण.    जेव्हा माझा मी एककल्ली माझ्या आयुष्यातला उजाडपणा,वैराणपणा पायदळी तुडवत होतो. क्रूर नियतीचा प्रत्येक घाव जिव्हारी लागत होता. मनही  संवेदना हरवत चाललं होतं. तेव्हा प्रत्येकजण स्वतःच्याही नकळत चुकून  माझ्या आयुष्यात आला. त्याने काय पाहीले माहीत नाही मात्र माझ्या आयुष्यात कायमचे पाय रोवले.   आजही पावला पावलावर आयुष्याचा निर्दयपणा जाणवतो. पण माझी खात्री आहे,आयुष्याचा निर्दयपणा मला नाही ठेचु शकणार. कारण; पर्वताच्या छातीचे मित्र माझ्या पाठी आहेत.    माझ्या सर्व मित्रांचे लाख लाख आभार......!

(सहज सुचलेलं काही) दि.८-१०-२०१८

   आयुष्यातील गुंतागुंत इतकी वाढत चालली आहे की,मला काही सुचत नाही. ज्या गोष्टीचा विचार करणं मला कधीच महत्वाचे वाटले नाही,त्याच गोष्टीचा विचार करणं मला आज जगण्याहून अधिक वाटते. -: लखन दगडे 

कैदी - दि. २८-९-२०१८

  आजही आयुष्य पुन्हा पुन्हा त्याच वळणावर श्वास घेतं; ज्या वळणावर तू पहिल्यांदा भेटली होतीस. माझ्या आयुष्याला झालेला तुझा तो पहिलाच स्पर्श किती सुखावह होता. नंतर मात्र आयुष्याला तुझीच सवय झाली. पण देवाने आयुष्यात तुझ रितेपण माथी मारले कायमचे....    आज तरीही तुझ्या आठवणीच्या हिंदोळ्यावर पुन्हा पुन्हा झुलत असतो,माझ्या आयुष्यावरील तुझ्या अस्तित्वाचे नियतीने काढलेले ओरखडे कधी कधी न्याहाळत असतो पुन्हा पुन्हा. तुला माहीत नाही, तुझ्यावाचून मी जगापासून स्वतःलाच कैद करून घेतलं. तुझ्यावाचून जगातल्या प्रत्येक गोष्टीचाच मला तिटकारा वाटू लागला होता. तुझ्यासोबत पाहिलेली स्वप्ने मला इतर कुणासाठी नाही जगता आली. त्यामुळेच आयुष्यातील एकाकीपणाच्या कारागृहात जन्मठेप भोगतोय. म्हणूनच तर पुन्हा तेच वळण तिच वाट मी पुन्हा पुन्हा तुडवतोय.    आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केले मात्र, तुला मिळवण्याचा अट्टाहास आयुष्यभर कधीच केला नाही. कारण, तुला तिळमात्रही दुःख देण्याचा विचार मनाला कधीच नाही शिवला. तुला विसरण्याचा प्रयत्नही खूपवेळा केला पण मला कधीच शक्य नाही झालं माझ्यातलं तुझ अस्तित्व, जगाच्या पसार्‍यात अस्ताव्यस्त

उगाचच काहीतरी मनात आलं दि. १६ सप्टेंबर २०१८

  नियतीच्या क्रूर खेळापुढे हतबल होऊन, आयुष्यभर उराशी बाळगलेली माझी स्वप्नं माझ्या भाव भावनांचा मी खून केला. आणि  त्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रेते विस्मृतीच्या अंधाऱ्या खोल दरीत लोटून दिली. पण आता त्यांचे सांगाडे मला स्वप्नात येऊन छळतात.माझ आयुष्य आत्ता पश्चातापाच्या आगीत अविरत जळत चाललय.    स्वतः बद्दलच्या अनेक चिंता आणि  असंख्य काळज्या यांनी माझ आयुष्य किडत चाललय. यामुळेच कदाचित  कितीतरीजणांच्या आयुष्यातून मी कधीच हद्दपार झालोय. माझ्या अपराधी हातांनाही आता नव्या स्वप्नांना कवेत घेण्याचा धीर होत नाही. -: लखन दगडे